पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल,

0
Spread the love

इलेक्ट्रॉनिक पडदा (स्क्रीन) अचानक अंगावर पडल्याने तीन लहान मुले जखमी.

पुणे सिटी टाईम्स; प्रतिनिधी. पुण्यातील सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावतीमध्ये तळजाई वसाहतीत शुक्रवारी रात्री घडली होती.

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी सुभाष जगताप तसेच एका टेम्पोचालकाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. थेट नगरसेवकास जबाबदार धरल्याने चर्चेला उधाण आले आहे.


प्रांजल विजय आदमाने वय ६, अनुष्का विशाल रणदिवे वय ६, सौरभ जालिंदर पाटोळे वय ७ सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अमंलदार संतोष कराड यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तळजाई वसाहतीत एका सिनेमाच्या प्रदर्शनासाठी इलेक्ट्रॉनिक पडदा लावण्यात आला होता. पडद्याला विद्युत पुरवठा करण्यासाठी एका रोहित्रातून बेकायदा वीजजोड घेण्यात आली होती.

एका टेम्पोने पडद्याला धडक दिली त्यानंतर पडदा कोसळला. पडद्याच्या समोर बसलेली ३ लहान मुले जखमी झाली.जखमींपैकी एका लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अशी माहिती समजत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here