पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, १० हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई (मंगळवार) घोडेगाव तहसील कार्यालयासमोर केली आहे.
मंडल अधिकारी योगेश रतन पाडळे वय ३८ व खासगी इसम लक्ष्मण सखाराम खरात वय-६० असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३६ वर्षीय नागरिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली होती.
त्या जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी योगेश पाडळे याने १० हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा रचला. तहसील कार्यालयासमोरील हॉटेल्समध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे याला पकडण्यात आले आहे.
लक्ष्मण गायकवाड याने लाचेची मागणीस सहाय्य केले म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.