पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पेरुगेट पोलीस चौकीपासून काही अंतरावरच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भररस्त्यात हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर तरुण आणि जखमी झालेली तरुणी हे एकाच गावात राहणारे आहेत.दोघांचे गावाकडे प्रेमसंबंध होते .यानंतर ही तरुणी शिकण्यासाठी पुण्यात आली तिने स.प.महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
पुण्यात आल्यावर दोघांमधील संबंध कमी झाले.आपल्याला सोडून ती दुसऱ्याबरोबर असल्याचे या तरुणाला समजले.त्यामुळे तो गावावरुन पुण्यात आला.त्याने कॉलेजमध्ये जाऊन तिचा शोध घेतला . तिचा पाठलाग करत तो पेरुगेटपर्यंत आला.
तेथे त्याने तिला अडवून विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने कोयत्याने वार करुन जखमी केले. रस्त्यावरील लोकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे . विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.