पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरातील कुख्यात व तळीराम गुंडांची पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलीच परेड घेतली आणि सोशल मीडियावर गुन्हेगारांची नामुष्की झाली. परंतु गुन्हेगारांचे आजही सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्हेट असल्याने परेड घेऊन काय फायदा झाला आहे का? असा प्रश्न आज पुणेकर विचारत आहे. एक सरसकट गुन्हेगारांना एकाचवेळी पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावले असल्याने इतिहासातील ही पहिलीच घटना असवी?
गुन्हेगारांना पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे डीसीपी, एसीपी यांनी गुन्हेगारी अजीबात खपवून घेतली जाणार नाही. असे खडसावून सोशल मीडियावर रिल्स,पोस्ट फोटो टाकण्यास मनाई केली असली तरी आज गुंडांचे फॅन फॉलॉवर ची संख्या मोठी आहे.
त्यामुळे त्यांचे जुने फोटो,रिल्स लाईक कमेंट केल्यास त्याचा रिच वाढतोय? मग त्यांनी रिल्स,फोटो टाकले किंवा नाही तर प्रसिद्धी मिळतच आहे. म्हणून पुणे शहर पोलिसांना गुन्हेगारी मोडूनच काढायची असेल तर सर्व गुन्हेगारांचे सोशल मीडियावरील अकाउंट डिलीट मारायला भाग पाडावे, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.