कोंढव्यातील चेतना गार्डन येथे जीवघेणे बांधकाम सुरू; कारवाईची मागणी

0
Spread the love

सहा-सात मजली इमारत उभी करण्यासाठी फक्त ५ फुट खणला खड्डा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

कोंढवा खुर्द भागातील मिठानगर गल्ली नंबर ९ चेतना गार्डन येथील मंदिरा जवळ अवैध बांधकाम करून नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे.अवैधरित्या बांधकामे करून ड्रेनेज, लाईट, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष होत आहे.

शासनाचा महसूल बुडविणयाचा उददे्श संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा दिसत आहे. सहा ते सात मजली इमारत उभी करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा फुट खाली जाऊन फुटिंग भरणे आवश्यक असताना जेमतेम सहा फुट खड्डा खणून फुटिंग भरण्याचा प्रकार सुरू आहे.

इमारत उभी झाल्यानंतर त्यात मजबुतीकरण आले नाही व ती इमारत ढासळली तर याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.पालिकेकडे माहिती घेतली असता सदरील बांधकामाला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अश्या धोकादायक बांधकाम थांबविण्याची व कारवाईची मागणी समाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here