येरवडा जेलमधील अधिका-यांचा वचक कमी झाल्याने सारखेच होत आहे जीवघेणे हल्ले; नाना गायकवाड यांचा जीवघेण्याचा प्रयत्न

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

एकेकाळी येरवडा जेलमधील जेलरचं नाव ऐकले की गुन्हेगार थरथर कापायचे, परंतु गुन्हेगारच जेलमध्ये हवा करायला व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतानाही जेल प्रशासन मुग गिळून गप्प बसल्याने गुन्हेगारांची मजल वाढली आहे. मोक्का अंतर्गत जेलमध्ये असलेले नाना गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने जेल पण गुन्हेगारांपासून सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

नाना गायकवाड सध्या येरवडा कारागृहात असून एका कैद्याने त्यांच्यावर पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला आहे. या घटनेमुळे येरवडा कारागृहात खळबळ उडाली आहे. ही घटना आज ३ तारखेला शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्रं.१ समोर घडली आहे.सुरेश बळीराम दयाळु असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्र.१ आणि १२ येथे कैदी साफसफाई करत होते. त्यावेळी नाना गायकवाड हे खोली क्र.१ समोर खुर्चीवर बसले होते. त्यावळी आरोपी सुरेश दयाळु याने फिर्यादी यांच्या पाठिमागून आला.त्याने पोलिसांची नजर चुकवुन लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने नाना गायकवाड यांच्या उजव्या गालावर वार केला.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तर जखमी नाना गायकवाड यांना कारगृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपी सुरेश दयाळु याच्यावर आयपीसी ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here