पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. जगताप यांचे भावाला आरोपी सोन्या शेलार याने फोनवरून धमकी दिली. तपास पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना , वानवडी पोलीस ठाणेकडील तडीपार गुन्हेगार श्रीधर ऊर्फ सोन्या विठ्ठल शेलार , वय -३५ वर्षे , रा.शांतीनगर , स.नं .५४ / ९ब , वानवडी , पुणे हा शिंदे छत्री,नुराणी कब्रस्थानकडे जाणारे रोडवर वानवडी या परिसरात दारूच्या नशेत धारदार हत्यारासह फिरत असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,यांचे आदेशाप्रमाणे सापाळा रचून श्रीधर ऊर्फ सोन्या यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.सदर तडीपार आरोपीस पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – ५ यांचे कार्यालय जावक क्रमांक ४५५२/ २०१६ व तडीपार आदेश क्र .१७/२०२१ दि. ९ / ७ / २०२१ मुंबई पोलीस अधिनियम सन १ ९ ५१ चे कलम ५६ ( १ ) ( अ ) ( ब ) अन्वये पुणे शहर , पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून २ वर्षाकरीता तडीपार असतानाही , पुणे शहरात येण्यासाठी कोणाचीही पुर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या पुण्यात आला होता .
त्याप्रमाणे वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७७/२०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून , दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार , महेश गाढवे , तपास पथक हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त,विक्रांत देशमुख ,सहायक पोलीस आयुक्त,साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक ,भाऊसाहेब पटारे,तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक , संतोष सोनवणे , पोलीस अंमलदार , महेश गाढवे , अतुल गायकवाड , हरिदास कदम , विठ्ठल चोरमले , राहुल गोसावी , अमोल गायकवाड , निळकंठ राठोड यांनी केली आहे .