हुक्का पार्लर चालू असताना वानवडी पोलिसांचे दुर्लक्ष का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे महानगर पालिकेने रूफटॉप हॉटेलांना परवानगी दिली नसतानाही, बेकायदेशीरपणे हॉटेल चालू आहेत. कोंढवा लुलानगर येथील मार्वल विस्टा सोसायटीत व्हेजिटा रेस्टॉरंट हे बेकायदेशीरपणे रूफटॉपवर चालविले जात असताना, पुणे महानगर पालिका व वानवडी पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

व्हेजिटा रेस्टॉरंटला १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी भलीमोठी आग लागली होती. त्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हाणी झाली नसली तरी आज पुन्हा त्या ठिकाणी रूफटॉपवर बेकायदेशीरपणे हॉटेल नव्याने सुरू करण्यात आले आहे.
मागील बातमी }}} कोंढव्यातील लुल्लानगर चौकातील मार्व्हल विस्टा हॉटेल मध्ये आगीची घटना; व्हिडिओ
तर सदरील रेस्टॉरंट मध्ये हुक्का पार्लर चालू असताना देखील वानवडी पोलिसांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. नागरिकांचे जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रूफटॉपवर रेस्टॉरंट थाटणाऱ्या व्हेजिटा रेस्टॉरंटच्या मालका विरोधात कारवाईची मागणी पुणे महानगर पालिका आयुक्त व पुणे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. क्रमशः