पुणे सिटी टाईम्स ( PCT ONLINE) प्रतिनिधी.
पुणे कसबा पेठ आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुस्लिम, अल्पसंख्याक समाजाच्या भावाना दुखावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.२२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित एफसी रोड, साखर संकुल भागात अत्यंत संवेदनशील मजकूर आणि कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्याचे चित्रण करणाऱ्या प्रतिमा बॅनर लावल्या होत्या.
असे बॅनर मुळे अल्पसंख्याक समाजाच्या विशेषत: मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन पुणे शहरातील शांतता आणि सौहार्द भंग होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
संवेदनशील बॅनर लावण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.अशी लेखी तक्रार मागणी समाजिक कार्यकर्ते अनवर शेख यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. सदरील माहिती अनवर शेख यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.या संदर्भात आमदार रविंद्र धंगेकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.