पुण्यातील गोल्डन बेकरीच्या केक मध्ये पाल मिळूनही कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी,

0
Spread the love

अधिकाऱ्यांनी साटेलोटे केल्याचा तक्रारदाचा आरोप?

तक्रारदाराकडील केकचे नमुने घ्यायचे सोडून भलतीच तपासणी?

तक्रारदाराने कंजूमर कोर्टात जावे फुड निरिक्षक कुलकर्णी यांचे वक्तव्य?

बेकरीत पेस्ट कंट्रोल केलेले नाही, कामगारांचे आरोग्य प्रमाण पत्र नाही, स्वच्छता आढळून आलेली नाही व इतर स्वरुपाचे दोष आढळलेले आहे. ( Pune golden bakery news FDA news )

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, मुलांना खाण्यासाठी घेतलेल्या केक मध्ये पाल सापडल्याने लहान मुलांसहित मोठ्यांना ही धक्काच बसला, सदरील घटना पुणे शहरातील सॅलेसबरी पार्क येथील गोल्डन बेकरी मधून घेतलेल्या केक मध्ये घडली आहे.

केक मध्ये पाल मिळूनही अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाने कारवाई न केल्याने तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

हकीकत अशी की गोल्डन बेकरी मधून फरियाज पठाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी मुलांना खाण्यासाठी व्हेज मावा केक घेतले होते,आणि ते केक घेऊन घरी गेले परिवारासहित केक कापत असताना पठाण यांच्या केक मध्ये काळया रंगाची पाल असल्याचे निर्दशनास आले. त्यावेळी फरियाज पठाण यांनी केक मध्ये आढळलेल्या पालीचे विडियो व फोटो काढून दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त बा.म.ठाकुर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला,

त्यावेळी ठाकूर यांनी सदरील केकचा फोटो काढून फुड निरिक्षक कुलकर्णी यांनी व्हाट्सअप पाठवून कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सदरील गोल्डन बेकरीची तपासणी करून अन्न सुरक्षा मानके कायद्या कलम ३२ नुसार पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्यात आला.

परंतु त्या अहवालात दडलंय काय? याचे गुपीत आजही तक्रारदाराकडे उघड करण्यात आलेले नाही. अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त बा. म. ठाकूर व फुड निरिक्षक कुलकर्णी यांना तक्रारदार फरियाज पठाण यांनी वारंवार संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या दोघेही फोन उचलत नसल्याने पठाण यांनी थेट मुख्यमंत्री, अन्न औषध प्रशासन मंत्री आणि आयुक्तांकडे लेखी तक्रार करून झालेला सर्व प्रकार कथन केले आहे.

व्हेज मावा केक कधी खाण्यातच आले असते व त्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण? चौदा तारखेला तक्रार केली असताना चार दिवसांनंतर तपासणी का केली? तक्रारदाराकडील केकचे नमुने घ्यायचे का टाळण्यात आले? तपास अहवाल व पंचनाम्यातील माहिती तक्रारदाराला का कळविण्यात आली नाही? बेकरीधारकाचे व अधिका-यांचे साटेलोटे तर झाले नाही? असा प्रश्न तक्रारीत फरियाज पठाण यांनी उपस्थित केले आहे.

तर सहाय्यक आयुक्त बा. म. ठाकूर व फुड निरिक्षक कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी देखील लेखी तक्रारीद्वारे‌ पठाण यांनी केली आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी फुड निरिक्षक रमाकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आमची पुढची कारवाई चालू आहे आम्ही आमच्या कायद्यानुसार कारवाई करत आहोत. केकचे नुमने बाहेर नेण्यात आल्याने आम्ही ते ताब्यात घेऊ शकत नाही आणि ते नमुने ताब्यात घेण्याची आमच्या कायद्यात तरतूद नाही. तक्रारादाला ते मान्य नसेल तर त्यांनी कंजूमर कोर्टात जावे असे वक्तव्य कुलकर्णी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here