कोंढवा भाग्योदय नगर मधील अवैध गौण खनिज करून मोठी इमारत बांधणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

0
Spread the love

 

तर लवकरच कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांचे आश्वासन?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे कोंढवा मध्ये अवैध बांधकाम सुरू असून पुणे महानगर पालिकेकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी न करता, शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून अवैध बांधकामे करून लाखों रूपयांचा मलीदा स्वताच्या खिशात घातला जात आहे.

कोंढवा मधील भाग्योदय नगर गल्ली नंबर ४ एसबीआय एटीएम शेजारी ( एम.डी.सिलाई मशीन दुकान शेजारी) अवैध बांधकाम सुरू आहे. आणि विषेश म्हणजे अवैधरित्या गौण खनिज करून जिल्हाधिकाऱ्यांचा लाखोंचा महसूल बुडवला,

परंतु पुणे महानगर पालिकेची कोणत्याही प्रकारची नोंद न करता परवानगी न घेता आज भलीमोठी इमारत उभी केली असून भविष्यात वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागणार आहे.

यात काहीच शंका नाही? तर पुणे महानगर पालिकेने तातडीने संपूर्ण बांधकाम पाडून मोकळे करावे व जिल्हाधिकारी यांनी सदरील जागेवर बोजा चढवा अशी मागणी पुणे सिटी टाईम्सने केली आहे. तर लवकर सदरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल अशी माहिती अधिकृत अधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here