खडक वाहतूक पोलिसांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मागणी

0
Spread the love

शासन परिपत्रक धाब्यावर बसविल्याने कारवाईची मागणी.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

खडक वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीवर कार्यवाही केली जात नसल्याचं समोर आलं आहे. खडक वाहतूक पोलिसांच्या हद्दीत अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक सुरू असताना वाहतूक पोलिसांकडून कारवाई

केली जात नसल्याने एका तक्रारदाराने खडक वाहतूक विभागाकडे ६ जानेवारी रोजी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.

दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार व राज्याचे तत्कालीन मुख्य प्रधान सचिव जयंतकुमार बांठिया यांचे १८ जानेवारी २०१३ परिपत्रकानुसार १२ आठवड्याच्या आत तक्रारदाराला कार्यवाही बाबतीत कळविणे बंधनकारक आहे.

असे असताना ८ महिने कार्यवाही बाबतीत खडक वाहतूक पोलिसांनी कळविले नसल्याने तक्रारदाराने पुणे पोलिस आयुक्त व राज्याचे प्रधान सचिवांकडे शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here