पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेच्या वाहनांची फिटनेस, इंशुरन्स संपले असताना व वाहनांचे आयुष्य संपलेले असताना देखील बिनदिक्कतपणे पुणे महानगर पालिकेचे वाहने रस्त्यावर धावत असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या निदर्शनास आल्याने, पुणे महानगर पालिकेचा राक्षस धावतोय रस्त्यावर या सदराखाली पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केल्याने खळबळून जागी झालेली मनपाची यंत्रणेने वाहनांना ( राक्षस) जेरबंद केले आहे.
मागील बातमी वाचण्यासाठी }} पुणे महानगर पालिकेचा राक्षस धावतोय रस्त्यावर, वाहतूक शाखा व आरटीओचे देखील दुर्लक्ष.

तर सदरील अधिक माहितीसाठी व्हेईकल डेपोचे सुपेकर यांना फोन लावला असता ते म्हणाले मला अधिक माहिती सांगता येणार नाही? तुम्ही पायगुडे अथवा चव्हाण यांच्याशी संपर्क साधा. तर पायगुडे यांना संपर्क केला असता ते जेवण करीत असल्याचे सांगितले.

तर काही तासांनी पुन्हा संपर्क केला असता पायगुडे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आणि चव्हाण यांना फोन लावून माहिती द्या असे सांगितले. व्हेईकल डेपोत कुठेतरी पाणी मुरत असल्यानेच माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली आहे. तर अजून किती वाहने विना पासिंग रस्त्यावर धावत आहे याचा मागोवा पुणे सिटी टाईम्स घेणार आहे.