समिर शफि पठाण यांनी वाटले नागरिकांना लाडू.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, कोंढवा कोणार्क पुरम येथील रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणावर असून त्या ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्था बंद असल्याने नागरिकांना व सोसायटी धारकांना त्रास सहन करावा लागत होता.
त्याची दखल घेऊन नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समिर शफि पठाण यांनी लवकरात लवकर स्ट्रीट लाईट चालू करण्याची मागणी पुणे मनपाकडे केली होती.
मनपाने दुर्लक्ष केल्याने नागरिक अधिकार मंचा तर्फे शुक्रवारी कोणार्क पुरम येथे मेन बत्ती जलाओ आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत पुणे महानगर पालिकेतील विद्युत विभागाने आज सकाळी सर्व स्ट्रीट लाईट चालू केल्याने नागरिक अधिकार मंचाने आभार व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप केल्याने सर्वत्र ठिकाणी चर्चा जोरात सुरू आहे.
समिर पठाण सारखा आम्हाला नगरसेवक हवा अशी भावनाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरील कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिक व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.