गोटीराम भैय्या चौकात ६ जण का लागतात कारवाईला? नागरिकांचा संतप्त सवाल?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
मध्यंतरी पोलिस आयुक्तांनी चौका चौकातून वाहतूक पोलिस काढून घेतल्याने पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता.परंतू आता पुन्हा रस्त्यावर गरडा घालून साज शोधताना वाहतूक पोलिस दिसत आहेत,तर विषेश म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशालाच पायदळी तुडवून केराची टोपली दाखवली जात आहे.
चौकात दोन अंमलदारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी थांबू नये असे कंट्रोल रूम मधून बीसीद्वारे ( broadcasting ) वरिष्ठांनी आदेश होते, त्यात कडक कारवाईचा देखील इशारा वरिष्ठांनी दिला होता. परंतु आदेश देऊनही खडक वाहतूक पोलिसांनी त्या आदेशाची ऐशी की तैशी केली आहे.
गोटीराम भैय्या चौक, प्यासा हॉटेल जवळ पाच सहा जण मिळून कारवाई करत असताना पुणे सिटी टाईम्सच्या निर्दशनास आले आहे.टिंबर मार्केट, घसेटी पूल, कस्तूरी चौक, पालखी चौक व इतर ठिकाणी वाहतूक जाम होत असतानाही फक्त गोटीराम भैय्या चौकातच ६ पोलिस पावत्या फाडताना दिसून येत आहे.
pune traffic news| खडक वाहतूक पोलिसांविरुद्ध पोलिस आयुक्त व राज्याचे प्रधान सचिवांकडे शिस्तभंगाची कारवाई मागणी*
आजूबाजूच्या दुकानदारांकडून माहिती घेतली असता रोजच कारवाई करून नागरिकांना वेठीस धरून पैसे उकळले जातात, रिक्षा चालक कसेही रिक्षा उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली आहे.
अश्या वाहतूक पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून पोलिस आयुक्त याची दखल घेऊन वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणार का? याकडे लक्ष टिकून राहाणार आहे.
” गोटीराम भैय्या चौक ड्युटी एकाची प्रत्यक्षात दुसरेच हजर “
गोटीराम भैय्या चौकात २३ तारखेला महिला पोलिस शिपाई अवघडे यांची सकाळी ८:३० ते १ आणि दुपारी ३ ते ९ अशी ड्युटी होती.तर २४ तारखेला चौधरी व घाटशिळे यांची ड्युटी होती.परंतु पुणे सिटी टाईम्सने पाहणी केली असता सदरील चौकात ५ ते ६ कर्मचारी उपस्थित होते.
” पीआय यांना फोन लावताच कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम “
खडक वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षक यांनी प्रतिनिधींनी संपर्क साधून गोटीराम भैय्या चौकातील सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ते म्हणाले की तेथे पीएसआय पवार व त्यांचे राईटर पवार हे आणि पेट्रोलिंगसाठी जोडी असल्याचे सांगितले,परंतु पीएसआय पवार हे इतरत्र कुठेही कारवाई करताना दिसत नाही? परंतु पीआयशी चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच पोलीस कर्मचारी चौकातून गायब झाले.