रेशनिंग कार्यालयातील कर्मचारी कपातीचा फटका सर्व सामान्यांना
अधिका-यांना सारख मिटींग तर सर्ववर डाऊन होत असल्याने कामे रेंगाळली.
ड्राफ्टेड होऊन आलेल्या कर्मचारी अन्न धान्य कार्यालयातून परिमंडळ कार्यालयाला का दिले जात नाही.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
महाराष्ट्रातील रेशनिंग कार्ड ऑनलाईन केल्याशिवाय देऊ नये असे शासन निर्णय निघाल्याने पुण्यातील रेशनिंग कार्यालयातील अधिका-यांना तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. दिवसभरात रोजचेच येणारे रेशनिंग कार्डांची कामे व आरोग्य दाखल्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे चांगलीच पंचायत झाली आहे. पुणे सारख्या शहरात म्हणजे स्मार्ट सिटी मध्ये सारखच सर्वर डाऊन होत असल्याने नागरिकांचे हेलपाटे वाढले आहे.
दिवसभरात फक्त तीन ते चारच अर्ज ऑनलाईन प्रणालीत होत असल्याने अधिकारी व कर्मचा-यांना रात्री उशिरापर्यंत जागरण गोंधळ करायची वेळ आली आहे.ऑनलाईन रेशनिंग कार्ड देण्याचे विचार चांगले असले तरी आज त्याचा मनस्ताप नागरिकांना सोसावा लागत आहे. “पुणे सिटी टाईम्सच्या” प्रतिनिधींनी काही परिमंडळ विभागात समक्ष माहिती घेतली असता दोन तासात फक्त “एन” (N) नंबर पडण्यासाठी लागले आहेत. म्हणजे एखाद रेशनिंग कार्ड नोंदणी करूनच द्यावे लागले तर ८ तासांच्या कामाच्या वेळात फक्त आणि फक्त तीन ते चारच रेशनिंग कार्डांची नोंद होत आहे.
तर कधी कधी संपूर्ण दिवस सर्वर डाऊन दिसत आहे. सर्वर डाऊन असल्याने नागरिकांमध्ये व अधिका-यांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे दिसून आले, रेशनिंग कार्डातून युनिट वाढ, युनिट कमी,नाव कमी दाखल्याची कामे रेंगाळली आहेत. सर्वरच काम एन.आय.सी कडून केले जात आहे. तर एन.आय.सी ने आता कायतरी बदल केले पाहिजे, बदल झाले नाही तर मुंगीला हत्ताचा जेवण खायला दिले जात असल्याचे दिसून येईल, यावर लवकरच वरिष्ठांना तोडगा काढणे आवश्यक असल्याचे अन्नधान्य वितरण कार्यालयातून बोलले जात आहे.
अधिक माहितीसाठी अतिरिक्त कार्यभार असलेले अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांची भेट घेण्याचा प्रयत्न पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी केला असता मिटींग सुरू असल्याने भेट झाली नाही.
“ड्राफ्टेड होऊन आलेल्या कर्मचारी परिमंडळ कार्यालयाला देण्याची मागणी “
महाराष्ट्र शासनाच्या आकृती बंदीमुळे महसूल कर्मचारी अन्नधान्य कार्यालयातून काढण्यात आले होते. परंतु काहींनी “वसीला” लावून पुन्हा अन्नधान्य वितरण कार्यालय गाठले आहे. परंतु काही चांगले कर्मचारी वगळता वादग्रस्त कर्मचारी रूजू झाले आहे. त्यांना वगळता चांगले कर्मचा-यांना पुन्हा अन्नधान्य वितरण कार्यालयातून परिमंडळ विभागात देण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे.