वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालनेही झाले अवघड?
वाहतूक पोलिसांचा पगार आम्हाला द्या आम्ही करतो वाहतूक सुरळीत? नागरिकांचा संतप्त सवाल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
बघता बघता कोंढव्यात लाखोची जनसंख्या झाली असताना, वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याने, नागरिकांना स्वतः हातातील वाहने सोडून रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवावी लागत आहे. वाहतूक पोलिस विभाग कोंढव्यातच अस्तित्वात असताना, वाहतूक पोलिस असूनही नसल्या सारखे म्हणजे मिस्टर इंडिया सारखे गायब झाले आहेत?
वाहतूक पोलिस सध्या वसुली व खडी मशीन चौकातच फक्त वाहतूक सुरळीत करताना दिसत आहे. म्हणजे खडी मशीन येथे नागरिक राहतात आणि कोंढव्यात गुरं? आज कोंढवा खुर्द मधील अशोका म्युझ च्या पाठीमागील बाजूस भाग्योदय नगर, मिठानगर, नवाजीस पार्क, शिवनेरी नगर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असताना देखील वाहतूक पोलिस नसल्याने, मला जाऊ द्या घरी वाजले की दहा? आणि वाहतूक पोलिस देता का वाहतूक पोलिस? अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
अवैध वाहतूक सुरू असताना व जड वाहने दिवसरात्र फिरत असताना देखील मात्र वाहतूक पोलिस ठंड बसलेत आहे? अधिक माहिती घेतली असता कोंढवा वाहतूक विभागातील वसुली पंटर मुळे अवैध वाहतूक व जड वाहतूकीस सुगीचे दिवस आले आहेत.
शितल पेट्रोल पंपा समोर, मिठानगर बस स्टॉप, कौसरबाग, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, आणि इतर परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना स्वतः वाहतूक कोंडी सोडवावी लागत असून, वाहतूक पोलिसांची पगार आम्हाला द्या आम्ही दिवसरात्र ईमाने ऐतेबाराने वाहतूक कोंडी सुरळीत करू? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.