अतिक्रमण विभाग राहिले फक्त नावापुरतेच?
” भाग २ “
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची अवस्था आज आंधळ दळतय कुत्र पिठ खातोय? अशी झाली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर जिते जाईल तिथे अतिक्रमण झाले असले तरी अतिक्रमण निरिक्षक व भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी हे काळा चष्मा परिधान करून बसलेत. भवानी पेठेतील रामोशी गेट पोलिस चौकीच्या समोरील बाजूस फुटपाथवर लाकूड ठेवण्यात आले आहे. तर क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे चौक, चंदन सवीटच्या आजूबाजूच्या परिसरात रस्त्यावरच लाकूड व्यवसायिकांनी दुकाने थाटलयाचे दिसून आले.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अतिक्रमणाचा विळखा, लाकूड व्यवसायिकांना अधिकाऱ्यांचा अभय? अतिक्रमण विभाग राहिले फक्त नावापुरतेच? व्हिडिओ 👇
तर गंज पेठ महावितरण ऑफिस समोर देखील फुटपाथवर लाकूड ठेवल्याचे दिसून आले. आणि सोनमार्ग चौकात फुटपाथवर व नाल्यावरच लाकूड ठेवून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. परंतु भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असून अतिक्रमण निरिक्षकाला पाठीशी घालत असल्याची माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर लहान ठेला लावला तर ईमाने ऐतेबारे अतिक्रमण विभागातील कर्मचारी उचलून नेत कारवाई करून मोठे तिर मारल्याचे दाखवतात. परंतु लाकूड व्यवसायिकांनी दुकाने रस्त्यावर, फुटपाथवर मांडून सुध्दा कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. एकदा कारवाई करायची व नंतर मलाई खात बसायचे अशी मानसिकता तर नाही ना? असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयात अधिक माहिती घेतली असता अतिक्रमण निरिक्षक यांनी क्षेत्रीय कार्यालयात धुमाकूळ घातला असून क्षेत्रीय अधिकाऱ्याची याला मुक संमती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अधिक माहिती घेण्यासाठी पुणे सिटी टाईम्सचे प्रतिनिधी सायंकाळी ५:१० वाजता क्षेत्रीय कार्यालयात अतिक्रमण निरिक्षक राजू लोंढे यांना भेटण्यासाठी गेले असता सदरील निरिक्षक महाशय ४ वाजताच घरी गेल्याची माहिती मिळाली. निरिक्षकांना वेळेचे बंधन नाही का? फक्त मनमर्जीपणा सुरू आहे.
अधिक माहितीसाठी अस्मिता तांबे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.अतिक्रमण करून रस्ते हायजॅक करणाऱ्या लाकूड व्यवसायिकांवर भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी अस्मिता तांबे धुमाळ काय कारवाई करणार याकडे लक्ष वेधून राहणार आहे. क्रमशः
” अतिक्रमण विभागात ठेकेदार कर्मचाऱ्यांचा राज? “
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अतिक्रमण विभागात ठेकेदार पध्दतीने कर्मचारी नेमण्यात आले आहे. परंतु ते कर्मचारी मशात येईल तेव्हा कामावर येतात तर मनात येईल तेव्हा घरी जातात. यांना बघणाराच व वचक ठेवणारा वालीच कोणी राहिला नाही. तर अतिक्रमण निरीक्षकाच्या पाठीमागे फिरल्याने यांचे दोन्ही हात तुपात असल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.