शिक्षकभरती गैरव्यवहार प्रकरणात आता झाली “ईडी” ची एंट्री.

0
Spread the love

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना हजर होण्याचे आदेश.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

शिक्षण विभागातील अनेक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत असल्याने शिक्षण विभागातील अब्रूचे लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. मध्यंतरी शिक्षकभरती घोटाळा पुणे शहरात खुपच गाजला, तर घोटाळे बाजांना न्यायालयातील चकरा वाढल्या होत्या, ते काही थोड शांत होण्याच्या मार्गावर असताना त्यात आता “ईडी” ने एंट्री मारल्याने घोटाळे बाजांचे धाबे दणाणले आहे.

शिक्षक भरती बंदी असतानाही बेकायदा शिक्षक भरती केल्याचे प्रकरण समोर आणणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या विस्तार शिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांना सक्तवसुली संचनालयाने नोटीस बजावली आहे.

भरती घोटाळ्यातील सर्व कागदपत्रे घेऊन दोन ऑगस्ट रोजी मुंबईत चौकीसाठी हजर राहण्याचे म्हटले आहे. एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती.

त्यामध्ये २३ शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते त्या शिक्षण संस्थेने त्यांच्याच दुसऱ्या संस्थेत काही शिक्षकांची बोगस भरती केल्याचे दाखवले होते. त्या आधारावर राज्य सरकारकडून पगार काढून घेतले.

त्यानंतर काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा पहिल्या संस्थेत समाविष्ट करून घेतले त्यावरून बोगस शिक्षक भरती झाल्याचा प्रकार भुजबळ यांनी उघडकीस आणला होता.

त्या वेळी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात २८ जणांवर दात गुन्हा दाखल झाला होता. सक्तवसुली संचालनालयाला सदरील प्रकरणात मनी लांड्रीगचे प्रकरण घडल्याचा संशय आहे त्यामुळे या प्रकरणात स्वतःहून दखल घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here