पुणे रामटेकडी आनंदनगर भागात एकावर जीवघेणा हल्ला; ३ जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुण्यातील रामटेकडी आनंदनगर भागात एकावर जीवघेणा हल्ला; ३ जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री ९:३० वाजता सबेरा हॉटेल शेजारी लाकडी नक्षीकाम करणा-या कारखान्या समोर स.नं. १०८/१०९, आनंदनगर, रामटेकडी,

हडपसर, पुणे यातील फिर्यादी यांचे मित्र संगम महेश ठाकुर, वय २५, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे याने नमुद ठिकाणी त्याची मोटार सायकल पार्क केल्याचे कारणावरून त्याचा राग मनात धरुन फिर्यादीस शिवीगाळ करून, संगम ठाकुर यास त्याचे इतर साथीदार यांनी आपसात संगणमत करुन संगम याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कारखान्या मध्ये जबरदस्तीने ओढुन नेले,

धारदार हत्याराने त्याचे छातीवर, उजवे बरगडीवर, मानेवर, डावे बरगडीवर व पाठीवर वार करुन, त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी हे भांडणे सोडण्यासाठी मध्ये गेलो असता,

त्यांनाही हत्याराचे लाकडी मुठीने उजवे डोळ्याचे भुवईवर व टोकदार हत्याराने गळ्यावर वार करुन जखमी केले आहे. तर वानवडी पो ठाणे ४२४/२०२३ भादविक ३०७, ३२४,५०६, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहा.पोलीस निरीक्षक, राहुल गिरमकर पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here