मेनका गांधीकडे केली होती तक्रार.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.
श्वानांना खायला टाकणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिला पोलीस शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त, मुख्यालय रोहिदास पवार यांनी काढले आहेत.मुख्यालयातील सुभाष कुलकर्णी श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या हातातील भांडे फेकून, भांडे फोडून नुकसान केले. तसेच महिलेला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी पोलीस शिपाई मोहिनी कुलकर्णी यांनी दिली.
यावेळी झालेल्या झटापटीत महिलेच्या गळ्यातील चैन व पेंडल गहाळ झाले. याबाबत मोहिनी कुलकर्णी यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी घडला होता.तर याबाबत सदरील महिलेने मेनका गांधी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन गांधींनी पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.
महिला पोलीस शिपाई मोहिनी कुलकर्णी यांचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार तसेच पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निलंबन केले आहे.महिला पोलीस शिपाई मोहिनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमाचे उल्लंघन केले आहे.यांनी त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्त, मुख्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.