अन्नधान्य ग परिमंडळ अधिकारी करत आहे चौकशी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान,
पुण्यात बनावट पिवळी शिधापत्रिका विकणाऱ्या महिला एंजटाविरोधात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हकीकत अशी की पर्वती येथील अन्सारी नावाच्या व्यक्तीची बहिणीचे दोन महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी मदतीची व शिधापत्रिकेची आवश्यकता असल्याने ससून मधील एका गृहस्थाने अन्सारी याला “राणी” नावाच्या एका महिला एंजटाचा मोबाईल नंबर दिला आणि संपर्क साधण्यास सांगितले,
अन्सारी यांनी त्या महिला एंजटाला संपर्क करून शिधापत्रिका बाबतीत विचारणा केली असता त्या महिलेने ३५०० रूपये घेऊन सन २०१३ ची पिवळी शिधापत्रिका एका दिवसात आणून दिली.
त्या बाबतीत अन्सारीच्या लहान भावाला शिधापत्रिकेतील लहान मुलीचे वय चुकल्याचे निर्दशनास आल्याने तो अन्नधान्य ह” व ग” परिमंडळ कार्यालय गेले असता त्या पिवळ्या शिधापत्रिकेचे बिंग फुटले,
तेव्हा पासून सगळ्या हालचाली सुरू झाल्या होत्या, “पुणे सिटी टाईम्सने” बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अन्नधान्य ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांची अन्सारी यांनी भेट घेऊन,पैसे घेऊनही बनावट शिधापत्रिका देऊन त्यावर बनावट सही शिक्केचा वापर करून माजी फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित “राणी” नावाच्या महिला एंजटाविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर पुणे सिटी टाईम्सने ह” परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही,व ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांनी सांगितले की संबंधित व्यक्तीचा तक्रारी अर्ज कार्यालयात आला असून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. क्रमशः
"असा झाला उलगडा"
ज्या मुलीचे नाव त्या पिवळ्या शिधापत्रिकेत समाविष्ट आहे ती मुलीचे वय सध्या ९ महिने आहे.परंतू एंजटाने शिधापत्रिका विकताना घाई गडबडीत सन २०१३ तारीख टाकून त्यात मुलीचे वय ९ महिने केले आहे. विशेष म्हणजे ती मुलीचे वय आज रोजी ९ महिने आहे. त्यात आणखीन विषेश म्हणजे त्या शिधापत्रिकेतील रजिस्टर नंबर ह” ८० व संदर्भ नं १२० ची नोंदणच नसल्याचे समोर आले आहे.
“शिधापत्रिका कुठे वापरावी व कुठे वापरू नये याबाबतीत एजंटाचा सल्ला”
अन्सारी यांना शिधापत्रिका देताना ससून रुग्णालय व्यतिरीक्त इतर कुठेही वापर करू नये,ही फक्त औषध उपचारासाठी वापरावी असा सल्ला त्या महिलेने दिला होता.