पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये एकाच्या कानशिलात वाजविणाऱ्या भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्टेजवरुन खाली उतरताना आमदार अडखळल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना पडण्यापासून सावरले असताना, त्याबद्दल धन्यवाद देण्याऐवजी आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या कानशिलात मारली.
आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकाराची शुक्रवारी दिवसभर चर्चा होती. रात्री उशिरा भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी सरक वय ३५,यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला होता.ससून रुग्णालयातील इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक यांना बंदोबस्तासाठी थांबविण्यात आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळला. ते पाहून फिर्यार्दी हे पुढे होऊन त्यांनी सावरले असताना सुनील कांबळे यांनी डाव्या हाताने त्यांच्या कानशिलात मारली.
फिर्यार्दी यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले असता त्यांनी फियार्दी यांना मग काय झाले असे मोठ्याने दरडावून सांगितले. फिर्यार्दी यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून (भा. द. वि ३५३) कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.