खाद्यपदार्थ विक्रेत्यांनो सावधान;स्टेपलर पिनचा वापर केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून होऊ शकते कारवाई

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

सध्या खाद्यपदार्थ विकताना पार्सल साठी स्टेपलर पिनचा वापर केला जातो, परंतु ते चुकून एखाद्या व्यक्तीच्या तोंडात गेलेतर त्याचे नुकसान देखील होऊ शकते.या संदर्भात केंद्र शासन (FSSAI) भारत सरकार यांचे २७ जून २०१९ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणेबाबतीत कळविण्यात आले होते.


भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व अन्न व्यावसायिकांनी खादयपदार्थ पेपरबॅग / प्लास्टिक बॅगमध्ये ग्राहकांना पार्सल विकताना सदर बॅगज पॅक करताना स्टेपलर पिनचा वापर करु नये.

तसेच सदर बॅगला पॅक करताना चिकटपटटी (सेलोटेपचा) चा देखिलही वापर करु नये.जेणे करुन ग्राहकांच्या जीवितांस धोका पोहचू नये आणि कसलेही प्रकारे आरोग्यास बाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सं.भा.नारागुडे सह आयुक्त् (अन्न्) पुणे विभाग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here