अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, अजहर खान
अन्न व्यवसायिक, हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांनी न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले होते.
असे अन्न औषध प्रशासन विभागाचे आदेश असतानाही आज पुण्यातील हडपसर, कोंढवा, स्वारगेट, घोरपडे पेठ, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, कॅम्प, शिवाजी नगर, व इतर परिसरातील शेकडो खाद्य पदार्थ विकणा-यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
खाद्य पदार्थ विकणा-यांकडून दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळ चालला असला तरी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे?
वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसो ब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात.परंतु अन्न निरीक्षकांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे का? त्यांना नागरिकांच्या जिवाशी खेळ चाललेला दिसत नाही का?
नागरिकांच्या जिवाशी खेळणा-या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.