स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या आईचे निधन,

0
Spread the love

नगरसेविका हमीदा सुंडके यांच्या सासूबाई होत्या.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे मनपाचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या मातोश्री श्रीमती तलत परवीन सुंडके यांचे वार्धक्याने आज सकाळी निधन झाले आहे.

त्यांच्या मातोश्री श्रीमती आशाबी सय्यद यासुद्धा पुणे मनपाच्या नगरसेविका होत्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे
मोलाचे योगदान होते. विद्यमान नगरसेविका हमीदा यांच्या त्या सासू होत्या.

तलत सुंडके यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्ठी गर्दी उसळली होती. नगरसेवक रफिक शेख, माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख, सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख, हसनभाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन शेख, पुणे सिटी टाईम्सचे संचालक संपादक अजहर अहमद खान, सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान, आबिद शेख,

नगरसेवक साईनाथ बाबर, नागरिक अधिकार मंचाचे समिर पठाण, इसहाक पानसरे, व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपल्या सहवेदना व्यक्त करून सुंडके परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर नाना पेठेतील मन्नुशाह मस्जिद कबस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here