पुण्यात बनावट रेशनिंग कार्ड विकणारी टोळी सक्रिय.!

0
Spread the love

पुणे शहरातील नाना पेठेत महिला एंजटाचा प्रताप.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) अजहर खान,

पुणे शहरात बनावट रेशनिंग कार्ड तयार करून ती अवाच्या सव्वा रूपांमध्ये विकणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ग्राहक शोधून त्यांना बलीचा बकरा बनविला जात आहे. असाच एक प्रकार पुणे सिटी टाईम्सच्या हाती आला आहे.

पिवळ्या रंगाची शिधापत्रिका तयार करून ती ३ हजारांमध्ये बनावटरित्या व बोगस सह्या करून एकाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्वती येथील एका नागरिकाला रेशनिंग कार्डाची गरज असल्याने त्याला ३ हजारा मध्ये पिवळे रेशनिंग कार्ड बनवून दिल्याचे दिसून आले,

तर त्यात २०१३ साली असलेल्या तत्कालीन अधिका-ची बोगस सही मारल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यात ज्या नागरिकाला रेशनिंग कार्ड बनवून देण्यात आले आहे. त्यांच्या मुलीचे वय रेशनिंग कार्डात ९ महिने दाखविण्यात आले असली तरी ती मुलगी आज रोजी ९ महिन्यांची असल्याची त्याच्या जन्म दाखल्यावरून दिसत आहे.

म्हणजे मागील तारीख टाकून हे उद्योग केले आहे. ही सक्रीय टोळी नाना पेठे, शिवाजी नगर, मंडई, रेल्वे स्टेशन, जुनी जिल्हा परिषद, येथे कामे करत असल्याचे माहितीनुसार समजतं आहे.

ज्या महिला एंजटाने बनावट रेशनिंग कार्ड बनवून दिली आहे त्या महिलेची नाना पेठेत रेशनिंग दुकान पण असल्याचे बोलले जात आहे.

सदरील टोळीत ६-७ जण प्रमुख असून त्यातील “मेन बॉस” हा “काशेवाडी” मध्ये राहिला असून त्याच्या विरोधात ५-६ गुन्हे दाखल असल्याचे समजत आहे. पुढील चौकशी साठी व कारवाईसाठी पुणे सिटी टाईम्स पुरवठा अधिका-यांचे हवाले करणार आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here