पुणे महानगर पालिकेचा गलथान कारभाराचा फटका घोरपडे पेठ वासियांना; मोमीन पुऱ्यात ठिय्या आंदोलन

0
Spread the love

गेल्या दीड दोन महिन्यांपासून डांबरी कारणांसाठी रस्ता उखडून ठेवला.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुणे महानगर पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका घोरपडे पेठ, मोमीन पुऱ्यातील स्थानिक नागरिकांना बसला आहे. काही गरज नसताना रस्ते उखडून नागरिकांना त्रास देऊन मलाई लाटणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

पुणे महानगर पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका घोरपडे पेठ वासियांना, ठिय्या आंदोलन }}}} व्हिडिओ

घोरपडे पेठेतील मक्का मस्स्जिद,महाराणा प्रताप रस्ता ते विजय कदम चौक पर्यंत पुर्णपणे गेल्या दीड दोन महिन्यांपासून डांबरीकरणासाठी उखडून ठेवण्यात आला आहे.

वारंवार पत्रव्यवहार करूनही डांबरीकरण पुणे महानगर पालिकेकडून केले जात नसल्याने नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना ठिय्या आंदोलन करून रस्ता अडविला होता.

ठिय्या आंदोलन झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली होती. अधिक माहिती घेतली असता रमजान ईद आल्याने सदरील काम थांबविले असल्याचे व २४× ७ पाण्याची लाईन टाकण्यासाठी परवानगी दिली नसल्याने काम बंद होते. परंतु आता परवानगी मिळाली असल्याने लवकरच काम सुरू होईल असे पभ विभागाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here