गोदरेज कंपनीने रात्रीचा मांडला खेळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे येरवडा शास्त्रीनगर येथे अवैध गौण खनिजाचा प्रकार चालू असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. येरवडा पोलिस ठाण्यासमोर गोदरेज कंपनीचे कंट्रकशन काम चालू असून, सदरील गोदरेज कंपनीने तहसील कार्यालयाकडून गौण खनिज उत्खननाची परवानगी घेतली होती. सदरील परवानगी घेताना सुर्य मावळल्यानंतर गौण खनिज उत्खनन व त्याची वाहतूक करण्यात येऊ नये अन्यथा अवैध गौण खनिज उत्खनन समजून कारवाई केली जाईल.
असे आदेशात नमूद असताना सदरील जागेत खड्डा करणारा ठेकेदार मी कोणाच्याही बापाला भित नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला जुमानत नाही. असा समज करून सुर्य मावळल्यानंतरही अवैध गौण खनिज उत्खनन करत असल्याची तक्रार आजूबाजूच्या लोकांनी केली आहे. याची तक्रार नागरिक करायला गेले की, तो दबंगगिरी करून नागरिकांना हाकलून देत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
अश्या दबंगगिरी करणाऱ्या ठेकेदाराला व गोदरेज कंपनीला चपराक लावणे गरजे आहे. विशेष म्हणजे रात्रीचं गौण खनिज उत्खनन होत असतानाही येरवडा पोलिस मुग गिळून गप्प बसले आहेत? पोलिसांनी जेसीबी व इतर साहित्य तातडीने जप्त करून महसूल विभाग, किंवा तहसील कार्यालयाला कळवून फौजदारी गुन्हा नोंद करणे अपेक्षित होते. परंतु असे होताना दिसत नाही.
तर या संदर्भात पुणे शहर तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.आता तहसीलदार सुर्यकांत येवले काय कारवाई करतील याकडे लक्ष टिकून राहणार आहे.