पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ,४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार , मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत निर्णय

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

पुणेकरांना मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबई येथे बैठक झाली असून या बैठकीत पुणेकरांना मिळकत करात ४० टक्के सवलतीसह ३ पट शास्ती रद्द करण्यासचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

पुढच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव दाखल होऊन शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळाली असून या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.४० टक्के मिळकत कर सवलतीचं नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात ४०℅ कर सवलतीचा नेमका विषय काय आहे. समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेकडून मिळकत करात ४०℅ सवलत मिळत होती.

२०१८ मध्ये राज्य सरकारकडून ही कर सवलत बंद करण्यात आली होती. तसेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील राज्य सरकारकडून पुणे महानगर पालिकेला देण्यात आले होते.

४०℅ टक्के कर सवलत बंद झाल्याने पुणेकरांना भरमसाठ मिळकतकराची बिलं येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्ती करून या वसुलीला स्थगिती दिली होती मात्र याबाबतचे लेखी आदेश अद्यापही पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेले नाहीत एक एप्रिल पासून नवीन वर्षाची मिळकत कराच्या बिलांचं वाटप पुणे महानगर पालिकेकडून सुरू होईल याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here