पुणे हडपसर येथील रेशनिंग दुकानदाराचा धान्यावर डल्ला!

0
Spread the love

फेब्रुवारी पासून दिला नाही PMGKAY चा धान्य.अधिकारी व कर्मचारी काढतायेत झोपा?

धान्य चोरी करत असल्याची महिलेने तक्रार केली असता धान्य देण्यास दुकानदारा कडून टाळाटाळ.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, लॉकडाउन चया काळात नागरिकांना मिळणाऱ्या मोफत धान्यावर रेशनिंग दुकानदार डल्ला मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हकीकत अशी की पुणे हडपसर काळेपडळ येथील गजानन महिला बचतगट या रेशनिंग दुकानात हमिदा बाबू खान यांची ( RC NO 272011385658) नोंद असून त्यांच्या रेशनिंग कार्डावर ५ जणांची नोंद असून खान यांना नियमानुसार गहू १५ किलो तांदूळ १० किलो असे २५ किलो धान्य देणे दुकानदारावर बंधनकारक असताना रेशनिंग दुकानदार खान यांना १२ किलो गहू व ८ किलो तांदूळ देत असून दरमहा ५ किलो धान्य कमीत मिळत असल्याची तक्रार खान यांनी पुणे सिटी टाईम्सकडे तक्रार केली होती.

त्या संदर्भात ऑनलाईन ई- पॉस मशिनीवर पाहणी केली असता खान यांना PMGKAY हे धान्य देखील मोफत येत होते. हमिदा खान यांनी मागणी करूनही रेशनिंग दुकानदार में ते आजपर्यंत मोफत मिळणाऱ्या दरमहा २५ किलो धान्यावर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.

म्हणजे PMGKAY चे धान्य २५ व दरमहा ५ किलो असे एकूण ३० किलो धान्य दरमहा चोरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात हमिदा खान यांना कमी मिळत असलेल्या धान्य बाबतीत पुणे सिटी टाईम्सने अधिका-यांशी चर्चा केली असता रेशनिंग दुकानदाराने आमची तक्रार करता का? काय होणार तक्रार करून? तुमचं धान्य या पुढे देणार नाही? तुम्ही येते येऊ नका बचत गटाच्या बाया तुमच्यावर चिडलेले आहे? उगाचच नको भांडणे व्हायला? तुम्ही आता दुसऱ्या रेशनिंग दुकानातून घ्या? असे म्हणत धान्य देण्यासाठी टाळाटाळ करीत होते.

हमिदा खान यांनी पुणे सिटी टाइम्सशी पुन्हा संपर्क साधला असता रेशनिंग दुकानदाराने २ तास उभे करून संध्याकाळी धान्य देतो म्हणत खान यांना रिकाम्या हाती पाठवले, पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हमिदा खान ह्यांना संध्याकाळी पुन्हा दुकानदाराकडे पतीला घेऊन पाठवले असता गजानन महिला बचतगटातील तांबे याने या महिन्याचे धान्य तर दिले परंतु धान्य देताना हमिदा खान यांचे पतीचे फोटो काढले, दुकानदाराला फोटो काढायची गरज का भासली? धान्याची चोरी बाबतीत अधिका-यांशी चर्चा करुन ही कारवाई का नाही केली? त्याला पाठिशी घालण्याचे कारण काय?

पुरवठा निरीक्षकाने गजानन महिला बचतगटातील तांबे याला हमिदा खान यांना मे ते आजतागायत बुडविलेले PMGKAY चे धान्य देण्याची सुचना देऊनही धान्य न देण्याचे कारण काय?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांवर मुजोरी दाखवणा-या व तक्रारी करणा-या महिलेला भिती घालणा-या मुजोर रेशनिंग दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी हमिदा खान यांनी केली आहे. हमिदा खान सारख्या गरिब,गरजू महिलांचे धान्यावर डल्ला मारला जात असताना अन्नधान्य ड” परिमंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी झोपा काढत आहेत का?

हमिदा खान यांच्या सारख्या कित्येक तरी गोरगरिबांचे धान्य दिवसाभरात चोरले जात असेल याची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रेशनिंग दुकानदार चोर तर चोर वर शिरजोर होत आहे?

हमिदा खान यांना या महिन्याचा धान्य पुर्ण दिला असला तरी ९ महिन्याचे मोफत व दरमहा कमी दिलेले ५ किलो धान्याचे काय? तो धान्य दुकानदारासोबत कोणा कोणाच्या घशात गेला आहे? याची चौकशी करण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे. तर धान्याची चोरी करणाऱ्या संबंधित दुकानदारावर अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणी हमिदा खान यांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना बोलताना मत व्यक्त केले आहे. धान्य चोरी करून काळाबाजारात विकणा-या गजानन महिला बचतगट या रेशनिंग दुकानदारावर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले कोणती कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here