येरवड्यात १३ लाख ८७ रूपयांचा गुटखा तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांकडून जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स PCT NEWS) प्रतिनिधी

येरवड्यात १३ लाख ८७ रूपयांचा गुटखा तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. काल दि.२८ रोजी पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असलेला टेम्पो शास्त्रीनगर चौकाकडून पुणे नगर रोडने जाणार आहे.

सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुणे नगर रोडवर रविंद्र आळेकर, एकनाथ जोशी, सोमनाथ भोरडे ,भोसले हे सापळा रचून थांबलेले असताना पांढऱ्या रंगाचा पीकअप टेम्पो सिध्दार्थनगर रामवाडी पोलीस चौकीचे समोर आला. टेम्पो चालकासह ताब्यात घेवून टेम्पो चालकास नाव विचारले असता सवाराम लाबुराम देवासी वय ३९ रा. कोंढवा पुणे मुळगाव गुडा केसरसिंह , देसुरी , पाली , राजस्थान असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विमल व राजनिवास नावाचे प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थानी भरलेली पोती मिळून आल्याने अधिक चौकशी करता माल खडी मशीन चौक कोंढवा पुणे येथून टेम्पोमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेवून वाघोली पुणे येथे घेवून जात होता.

टेम्पोमध्ये एकूण १३ लाख ८७ हजार ८८० रूपये किंमतीचा गुटखा व तंबाखू जन्य पदार्थ मुद्देमाल मिळून आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात ५०८/ २०२२ भादवि कलम ३२८,२७३ , २७२ , १८८,३४ अन्नसुरक्षा व मानके कायदा कलम २००६ चे कमल २६ ( २ ) ( i ) , २६ ( २ ) ( iv ) , २७ ( ३ ) ( d ) , सह वाचन ३ ( i ) , ( Zz ) . ( v ) उल्लंघन केल्याने कलम ५९ सह सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात प्रतिबंध ) अधिनियम ७ ( २ ) , २० ( २ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर गुन्हयाचा पुढील तपास रविंद्र आळेकर करत आहेत.सदरची कामगिरी रोहिदास पवार पोलीस उपआयुक्त परिमंडळ -४ , किशोर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त , येरवडा विभाग, बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा,उत्तम चक्रे , पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्श नाखाली अधिकारी आळेकर, एकनाथ जोशी ,पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे , आनंदा भोसले यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here