हडपसर पोलीसांकडून महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष? महिलेने दिला आत्महत्येचा इशारा,

0
Spread the love

संबंधितांवर एनसी दाखल असतानाही पोलीस काही वाकडं करू शकत नाही असे वसूली वाले महिलांचे वक्तव्य?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, हडपसर पोलीसांकडून न्याय मिळत नसल्याने एका महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. गेले आठ दिवस हडपसर पोलीस ठाण्याला चकरा मारून मारून फक्त एन सी दाखल करण्या पलीकडे पोलीसांनी काहीच केले नसल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.

त्रस्त ज्योती दळवी यांचा व्हिडिओ

हडपसर येथील सिधीआंगण सोसायटी मधील ज्योती दळवी यांचा राजेश आबनावे यांच्या सोबत आर्थिक व्यवहार झाला होता, त्या व्यवहारात दोघात बिनसलयाने त्यांचा वाद आता कोर्टात सुरू आहे.

तरी देखील हडपसर पोलीस दळवी ते घर रिकामं करावं यासाठी समोरच्या व्यक्तीची बाजू घेत असल्याचे ज्योती दळवी यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींशी बोलताना अश्रू अनावर झाले होते.

दळवी यांच्या घराच्या गेटवर येऊन आरडाओरडा करताना महिला.

तर वसूलीला आलेल्या महिलांनी कळस गाठला आहे. ज्योती दळवी यांना मारण्या पर्यंत व घरात घुसून तोडफोड करण्या पर्यंत त्यांची मजल गेली आहे. परंतु हडपसर पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत? जो पर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तो पर्यंत पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी दळवी यांनी केली आहे.

ज्योती दळवी हडपसर पोलीस थांबलेले असताना

तर आता त्या वसूली वाल्या महिलांनी घरात कब्जा करून दळवी यांच्या घरात थांड मांडून बसलेले आहेत. तरी पोलिसांची आळिमिळी गुपचिळी का? असा प्रश्न ज्योती दळवी यांच्या मैत्रीण संभाजी ब्रिगेडच्या संगिता जुजगर व सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

याची दखल वरिष्ठ पोलिस अधिकारी घेणार का? ज्योती दळवी यांना न्याय मिळवून आत्माहत्ये पासून परावूत करणार का? असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here