शासन निर्णय धाब्यावर बसविण्यात आल्याने तक्रार दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे हडपसर येथील मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुलला यांना हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी पत्र बजावून खुलासा मागितला आहे. हकीकत अशी की पुणे हडपसर येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात अजहर खान यांनी तक्रार केली होती.
तसेच तक्रारीवर कारवाई झाली नसल्याने माहिती अधिकारात माहिती मागितली होती, परंतु त्या सर्व पत्रांना मंडल अधिकारी हडपसर यांनी व त्यांच्या कार्यालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्या बद्दल खान यांनी हडपसर मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुलला यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने तहसिलदारांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु चिरमुलला हे सुनावणीला देखील गैरहजर राहिले. तसेच पुढील कारवाई होत नसल्याने व कारवाईची फाईल दळवली जात असल्याने अजहर खान यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली,
त्या संदर्भात हवेली तहसिल कार्यालयाला पत्र प्राप्त झाल्याने यंत्रना खळबळून जागी झाली आणि मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुलला यांना ८ दिवसांत खुलासा मागितला आहे.
तसेच पत्रात नमूद आहे की आठ दिवसात खुलासा सादर केला नाही, तर आपले काहीएक म्हणणे नाही असे समजून आपणा विरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
अजहर खान यांनी या सर्व भोंगळ कारभाराविषयी खेद व्यक्त केला आहे. ११ महिने फक्त कागदी घोडे नाचविले जात आहे. परंतु अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तातडीने कारवाई झाली नाही तर हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या दालना समोर आंदोलन करण्यात येईल असे खान यांनी सांगितले आहे.