व्हिडिओ व्हायरल झाला तर याद राखा? थ्री स्टार असलेल्या पोलिसाची धमकी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे शहरातील रामटेकडी येथे एका वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्याला जबरदस्त मारहाण झाल्याचा प्रकार आज दुपारी १ च्या दरम्यान घडला आहे. रामटेकडी ब्रिजवर एका टू व्हीलर चालकाला ट्रकने पाठि मागून धडक दिल्याने टू व्हीलर धारक खाली पडला. आणि त्या नंतर तो टू व्हीलर धारकाने आपल्या २० ते २५ समर्थाकांना बोलावून घेत ट्रक चालकाला धू धू धुतले.
पुणे : रामटेकडी येथे एका दुचाकी धारकाला ट्रक चालकाने धडक दिल्याने ट्रक चालकाला मारहाण झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला ट्रक मधून बाहेर काढताना पोलिस. व्हिडिओ
त्या वेळी तेथे वानवडी वाहतूक विभागातील वाहतूक महिला पोलिस तेथे कर्तव्यावर असताना ती महिला कर्मचारी त्या ठिकाणी पोहचून, भांडणे सोडवत होती. तेवढ्यात एकाने महिला पोलिसाच्या कानठळ्या वाजवून जबरदस्त मारहाण केली? तर महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अवघड जागेवर जोरदार लाथ मारल्याने महिला कर्मचारी जागेवर पडली.
तेथे जमा असलेल्या नागरिकांनी व्हिडिओ, फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, तेथे आलेल्या टू व्हीलर धारकाच्या समर्थकांनी तलवारी काढल्याने नागरिकांनी पळापळ केली.
तेवढ्यात वानवडी पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी तेथे आल्यावर नागरिक व्हिडिओ काढत असताना व्हिडिओ काढायचा नाही? व्हिडिओ व्हायरल झाला तर याद राखा? थ्री स्टार असलेल्या पोलिसाने थेट धमकीच दिली.
एखाद्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला होणे ही बाब अंत्यंत गंभीर आहे. त्यात पोलिसांनी व्हिडिओ काढण्यासाठी मज्जाव केल्याने उलटसुलट चर्चा वानवडी वाहतूक विभागातून व वानवडी पोलिस ठाण्यातून ऐकायला मिळत आहे. अधिक माहितीसाठी पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, महिला कर्मचाऱ्याने फिर्याद देण्यास नाकार दिल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्यावर कोणाचा दबाव होता का? किंवा वरिष्ठांनी साथ न दिल्याने घाबरून फिर्याद दिलेली नाही? अथवा कोणता राजकीय दबाव आला होता का? याचा तपास होणं गरजेचं आहे.