भाजपाचे हेमंत रासने समोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर लढणार का इतर कोण?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरातील दोन आमदारांचे निधन झाल्याने पोट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपाने पुण्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी भाडपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.
या सगळ्या चर्चांवर आज पडदा पडला आहे. तर अजूनही काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली नाही. कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यास जोरदार फाईट होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.