पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे उच्च न्यायालयाने नगरसेवक पद धोक्यात आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.गफूर पठाण यांचे दगडफोडू जातीचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्दबादल केले आहे.
त्यामुळे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यांना तीन महिन्यात पुणे विभागीय जात पडताळणी समिती कडे या प्रमाणपत्राची फेर पडताळणी करुन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
२०१७ पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अब्दुल गफूर पठाण हे कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ओबीसी प्रवर्गातून निवडून होते.
त्यांच्या नगरसेवक निवडीला भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार अनुराधा मदन शिंदे, हुसेन खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.ए.सय्यद आणि न्यायमूर्ती एस.
जी.डीगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पठाण यांचे १७ जुलै २०१७ रोजी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबादल केले आहे. या बद्दल अधिक माहितीसाठी पठाण यांच्याशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.