रामटेकडीतील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासमोर गुंडांचा राडा!

0
Spread the love

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, हडपसर रामटेकडी येथील आनंद नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय आहे. तेथे सुरक्षेतेसाठी कार्यकर्ते सीसीटीव्ही कॅमेरे लावणार होते. परंतु ते गुंडांना खटकल्याने त्या गुंडांनी,इथे कॅमेरे लावायचे नाहीत,नाहीतर तुझा कार्यक्रम करुन टाकेन”

अशी धमकी देत ऑफिसचे बाजुला पार्क केलेल्या मोटार सायकलची कोयत्याने व दगडांनी तोडफोड करुन नुकसान करून परिसरात गुंडांनी दहशत निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी किसन आदमाने,वय ३३ वर्षे,रा.आनंदनगर, रामटेकडी, हडपसर,पुणे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून १) महादेव बसवराज पाटील,वय-२६ वर्षे रा.स.न.१०८/ १०९,आनंदनगर,रामटेकडी,पुणे २) तौसिफ रियाज शेख,वय-१८ वर्षे,रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर व इतर तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

हकीकत अशी की,स.नं.१०८/१०९,वंचीत बहुजन आघाडीच्या ऑफिसचे समोर,आनंद नगर, रामटेकडी, हडपसर ,पुणे येथे फिर्यादी हे वंचीत बहुजन आघाडीच्या ऑफिसचे समोर मित्र संजय घोडके यांचेसोबत बसले
असताना,त्यांच्या वस्ती मध्ये राहणारे पाटील व शेख यांनी फिर्यादी यांचे ऑफिसवर येवुन, “इथे कॅमेरे लावायचे नाहीत,नाहीतर तुझा कार्यक्रम करुन टाकेन” अशी धमकी देत ऑफिसचे बाजुला पार्क केलेल्या मोटार सायकलची कोयत्याने व दगडांनी तोडफोड करुन नुकसान केले.

तसेच कोयता हवेत फिरवत, “माझ्या नादाला लागलास तर ,तुझा इथच गेम करुन टाकेन या ठिकाणी कॅमेरे बसवायचे नाहीत,नाहीतर तुझा मुडदा पाडेन” असे म्हणत फिर्यादी यांचेवर दगडफेक करुन,सदर ठिकाणी दहशत करुन फिर्यादी यांचे ऑफिस मध्ये घुसुन, ऑफिस मधील खुर्ची,प्रिंटर,टेबल यांची तोडफोड करुन नुकसान केले.पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक माया गावडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here