पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
मी एम.एस.ई.बी. मधून बोलत आहे तुमचं लाईट बिल अपडेट करा म्हणत ५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर हडपसर पोलिस ठाण्यात ४१९,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ८१ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. दरम्यान आयरीस सोसायटी , ओ ६०३ , मगरपटटा सिटी हडपसर, पुणे.यातील नमुद अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादी यांना कॉल करुन मी . एम.एस.इ.बी मधुन बोलत असल्याचे सांगुन त्यांना आपले राहते घराचे लाईट बील अपडेट नाही,
![](https://punecitytimes.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023-06-12-15-26-36-568_com.google.android.apps_.docs-edit-842x1024.jpg)
असे सांगुन लाइट बिल अपडेट करुन देण्याचे आमिष दाखवुन एक मोबाईल लिंक डाउनलोड करण्यास सांगुन नमुद लिंकच्या माध्यमातुन फिर्यादी यांचे बँक खात्याची माहिती घेवुन त्यांचे बँकेचे खात्यातुन एकुण ५ लाख ५६ हजार ३२ रुपये अन्य खात्यामध्ये वळती करुन घेवुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष डांगे तपास करीत आहेत.