कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडूनच दिला जातोय अवैध बांधकाम करणाऱ्यांना ज्ञान?
राजेश खाडेंचा अजबच प्रकार इतरांवर ३५३ चा गुन्हा तर पानसरे नगर मधील दगडफेक करणाऱ्यांना अभय?
राजेश खाडे यांची चौकशीसाठी लवकरच लोक आयुक्तांकडे कारवाईची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ONLINE) प्रतिनिधी.
पुणे शहरातील अवैध बांधकामे फोफावली असताना पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ विक्रम कुमार यांनी समिती नेमली असली तरी आज त्या समितीचा खरोखरच फायदा होणार आहे का? फायदा होणार असला तरी खालील अधिकारी याला दाद देणार का? असा प्रश्न येवलवाडी पानसरे नगर मधील प्रकरणातून समोर आला आहे. कारण आपलेच अधिकारी अवैध बांधकामांना अभय देत असल्याचे समोर आले आहे. कोंढवा येवलवाडी पानसरे नगर मध्ये सर्वत्र ठिकाणी दोन तीनशे अवैध बांधकामे झाली असून सदरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा अधिकाऱ्यांकडूनच घाट, सल्ला दिला जात असल्याचा पुरावा हाती आला आहे.
पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभागाने काही दिवसांपूर्वी येवलवाडी पानसरे नगर मध्ये तोंड बघून कारवाई केल्याचा आरोप होत असताना देखील पुर्ण बांधकामे पाडण्याचा पालिकेतील राजेश खाडे यांना विसर पडला आहे. खरच विसर पडला आहे का? आर्थिक लाभ मिळाला आहे? याचा मागोवा सोर्स कडून घेतला असता, अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्णपणे कारखाने अवैध असताना तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे महानगर पालिका बांधकाम विभाग झोन २ मधील अधिकाऱ्यांनी आर्थिक साटेलोटे केल्याने कोणीच आमचा काही करू शकत नाही? या विचारधारेने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. सारखाच तगादा लावल्याने राजेश खाडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तोंड बघून कारवाई केली. मात्र पुर्ण कारवाई का करण्यात आली नाही. याची माहिती खाडे यांच्याकडे केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळले.
तर कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले एकदा कारवाई केली तर आम्ही पुन्हा कारवाई करत नाही. खाडे साहेबांनी संबंधीत अवैध बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. परंतु अद्यापही पत्रव्यवहार तयार केलेला नाही? त्यांनी आदेश दिला तर फौजदारी प्रक्रिया सुरू करण्यात येईल? कोंढवा राजेश खाडे यांच्याकडे असताना त्यांनी अनेक वेळा एकाच अवैध बांधकामांवर वारंवार कारवाई केली आहे? मग येवलवाडी पानसरे नगर मधील अवैध बांधकामांना वेगळा न्याय का? का त्यासाठी विक्रम कुमार यांनी वेगळा आदेश दिला आहे? अधिक माहिती घेतली असता आयुक्तांच्या नावे लाखो रुपये अवैध बांधकाम करणाऱ्यांकडून घेण्यात आल्याचे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. खरचं ते लाखो रूपये आयुक्तांकडे पोहोचलेत का? किंवा त्यांच्या नावाने सावरकर भवन बांधकाम विभाग झोन क्रं २, मधील अधिकाऱ्यांनी पचवलेत? याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
हिलटॉप हिलसुलूप, डोंगरमाथ्यावर आणि डेकडी उतारापासून १०० फुटांपर्यंत बांधकाम परवानगी देऊ नये,असे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने २०१७ साली दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित प्राधिकरणाला दिल्या आहेत. परंतु सगळेच नियमांचे पालन झाले तर ते मग अधिकारी कसले? मग सदरील बांधकामांना अभय पालिकाच देत आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. अधिक माहितीसाठी राजेश खाडे यांची भेट घेऊन कारवाई संदर्भात प्रश्न विचारताच त्यांनी काही एक न सांगता पळ काढला. याचाच अर्थ यात ते देखील सामिल नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे सगळे पुरावे घेऊन लवकरच मुंबई लोक आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली जाणार आहे.
” ३५३ ” शासकीय कामात अडथळा कारवाई देखील तोंड बघून केली जात असल्याचा आरोप? “
मागील आठवड्यात राजेश खाडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी फौजफाटा घेऊन जाऊन येवलवाडी पानसरे नगर मध्ये कारवाई सुरुवात केली. कारवाई सुरू असताना लोक मोठ्या प्रमाणावर जमली असताना पोलिस त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत असताना, काही लोकांनी तेथे दगडफेक देखील केली. परंतु ज्यांनी दगडफेक केली त्यांना राजेश खाडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अभय देत शासकीय कामात अडथळा व पालिकेचा नुसार केल्याचा गुन्हा देखील दाखल केला नाही. असाच प्रकार इतर कुठे झाला असता तर अधिकारी मात्र इमानदारीने गुन्हा दाखल करून मोकळे झाले असते. परंतु राजेश खाडे यांच्या कार्यकाळात तोंड बघून कागद रंगवली जात असल्याचे चित्र आहे.
अवैध बांधकाम पाडण्यात आल्यानंतर देखील त्यांच्याकडून खर्च वसुल केला गेलेला नाही?
अवैध बांधकाम पाडण्यात आल्यानंतर पुणे महानगर पालिकेकडून संबंधित बांधकाम करणाऱ्यांकडून खर्च वसुल केला जातो. परंतु या प्रकरणात असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे बोललेले जात आहे.
” प्लॉटिंगवर कारवाई होऊन देखील पुन्हा प्लॉटिंग विक्री सुरू “
सदरील पानसरे नगर मध्ये डोंगर उतारावर अवैध प्लॉटिंगवर कारवाई करून सिमेंट काँक्रीटीकरण केलेला रस्ता जेसीबी च्या सहाय्याने उखडून टाकला होता. परंतु आता पुन्हा त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या एका माजी नगरसेविकेच्या पतीच्या आशिर्वादाने प्लॉटिंग सुरू करण्यात आली आहे. यात कुठेतरी नक्कीच पाणी मुरत आहे.