बनावट केमिकल ताडी बनविण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेड (CH) हे केमिकल तयार करणारा अवैध कारखाना गुन्हे शाखेकडुन उध्वस्त.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

वरीष्ठांकडुन मिळालेल्या माहीती नुसार पुणे शहर व परीसरामध्ये काही इसम हे बनावट केमिकल ताडीकरीता लागणारे केमिकल विक्री करीत आहेत, हया माहीतीचे अनुशंघाने मागील काही दिवसांपासुन सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत होते.

२३ मार्च २०२४ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना माहीती प्राप्त झाली की मुंढवा परीसरामध्ये रहात असलेला आरोपी प्रल्हाद रंगनाथ भंडारी, वय ६१ वर्षे, रा- केशवनगर, मुंढवा, याचेकडे केमिकल,विषारी बनावट ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड (CH) चा साठा आहे, त्याप्रमाणे सदर ठिकाणी गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा कारवाई करुन आरोपीचे ताब्यातुन १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाचे ५ पोते एकुण कि. २ लाख ९५ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १२२/२४, भा. द. वि. कलम ३२८, ३४, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अ, ब, क, ड, ई, ६६ क, ड, ८१, ८३, ९० तसेच विष अधिनियमचे कलम २ (अ), ६ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला.

नमुद गुन्ह्यातील अटक आरोपीकडे कसुन तपास करुन त्याचे कब्जात मिळुन आलेले क्लोरल हायड्रेड (CH) हे त्याला आरोपी निलेश विलास बांगर, वय ४० वर्षे, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर जवळ ता आंबेगाव, जि पुणे याने पुरवविले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वरिष्ठांचे आदेशाने सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त माहीतीदारांकडुन तपास केला असता सदचा आरोपी हा पिंपळगाव खडकी, येथील त्याचे रहाते घराचे परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवुन आरोपी राहते घरामधुन पळुन जायचे तयारीत असताना त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल विचारपुस करुन तपास केला असता माहीती प्राप्त झाली.

की जि- अहमदनगर हद्दीतील शेती गट नं. १७७, हरीबाबावाडी, वेल्हाळे, ता- संगमनेर, जि- अहमदनगर येथे निलेश विलास बांगर हा असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिरपणे मनुष्याचे जिवीतास हानी पोहोचेल असे बनावट केमिकल,विषारी ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड (CH) पांढरे पिवळसर रंगाची क्रिस्टल पावडर तयार करणेचा अवैध कारखाना असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सदर ठिकाणी रवाना होवुन तेथे दोन पंचासमक्ष छापा टाकला.

सदर ठिकाणाहुन एकुण २,२१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेड (CH) तसेच ते तयार करणेसाठी लागणारे रिअॅक्टर, मशिनरी, काचेचे उपकरणे व इतर साहित्य असा सुमारे ५८ लाख ४६ हजार ४४ रुपयेचा मुदेमाल जप्त करुन अवैध कारखाना सिल करण्यात आला असुन सदर दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

तसेच सदर आरोपींना न्यायालयाने दिनांक २७ मार्च २०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजेश माळेगावे सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, प्रविण पवार पोलीस सह आयुक्त,शैलेश बलकवडे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे.अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे, सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १,सतिश गोवेकर, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहा.पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहा. पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण,

सहा. पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेय रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, युनिट ५ कडील पोलीस अंमलदार शिवले,कांबळे, शेख,दळवी यांनी केलीआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here