कोंढव्यात १५ पेक्षा जास्त टेरेसवर (रूफटॉप) बेकायदेशीर हॉटेल; पुणे महानगर पालिकेचे सर्रासपणे दुर्लक्ष का?

0
Spread the love

कारवाईचा फास झाला सैल?पुणे महानगर पालिकेची यंत्रणा झोपीगेली कुंभकर्णा सारखी?

राजकारणातील लोकांच्या दबावामुळे तर कारवाईची तलवार म्यानात नाही ना?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुणे शहरात आज बघता बघता बेकायदेशीर बांधकामांचा आलेख वाढला आहे. याला आत्ताच आवर घातलं नाही तर येणाऱ्या काळात बेकायदेशीर बांधकामांचा “बकासुर ” होण्यास वेळ लागणार नाही. आज पुणे शहरात विविध भागात बेकायदेशीरपणे टेरेसवर (रूफटॉप) हॉटेल सुरू असताना देखील पुणे महानगर पालिकेतील यंत्रणा कुंभकर्णा सारखी झोपीगेली आहे.

एखाद्या वेळी आगीची किंवा मोठी घटना घडल्यावर झोपेतून उठून कारवाईचा देखावा करून पुन्हा यंत्रणा पाच सहा महिने झोपून घटना घडण्याची वाट पाहत आहे.पुण्यातील बाणेर भागात तर, दोन दिवसांपूर्वी कोंढव्यात रूफटॉप हॉटेल जळून खाक झाल्यानंतर पुणे महानगर पालिकेने कारवाईचा देखावा केला,आज पुणे शहरात शेकडो रूफटॉपवर बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे हॉटेल व्यवसाय थाटले आहे.

पुणे सिटी टाईम्सने कोंढव्यातील “द व्हेजिटा” हॉटेलला लागलेल्या आगीची घटनेची दखल घेत कोंढव्यात रूफटॉप हॉटेलांची पाहणी केली असता अंदाजे १५ हॉटेल रूफटॉप ( टेरेसवर) चालू असल्याचे दिसून आले. हे हॉटेल पुणे सिटी टाईम्सच्या टिमच्या कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी पुणे महानगर पालिकेतील डोळे मिटून बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र दिसले नाही.

यात अधिकारी व कर्मचारी सामिल तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अपघात होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून आत्ताच निलंबन केले पाहिजे असे पुणेकरांकडून बोलले जात आहे. पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार व शहर अभियंता याची दखल घेणार का? क्रमशः

” कोंढव्यातील एन.आय.बी.एम व कोंढवा खुर्द रूफटॉप हॉटेल “

१) साळुंके विहार रोड रोझरी शाळेसमोर कलोअर वेलेज येथील जशन ( jashan) हॉटेल.

२) साळुंके विहार रोड रिलायन्स फ्रेश मार्ट ( कमेला रोड) सुफीज ( sufhiz) हॉटेल.

३) साळुंके विहार रोड अनुसया लोणकर उद्यान जवळ प्राईम लँडमार्क इमारतीच्या टेरेसवर क्रेझी पाईप्स (Crezy pipes) हॉटेल

४) साळुंके विहार रोड सनश्री संटेक आपारमेंट टेरेसवर सी. कॅफे ( c.cafe) हॉटेल.

५) व्हिस्टास सेंटर पॉइंट, एनआयबीएम रोडच्या बाजूला, मोहम्मद वाडी रोड बीबीसी ( BBC) हॉटेल

६) नाइन हिल्स प्लाझा, सैनिक विहार रोड, द एआरके समोर, फायर स्मोक ( fir smoke) हॉटेल

७) रूनवाल डायमंड,एन.आय.बी.एम पॅलेस ऑर्चर्ड, कोंढवा बिटटॉस ( bittoss) हॉटेल.

८) ब्रह्मा इस्टेट कमर्शियल प्लाझा, एनआयबीएम मुघल सराई रेस्टॉरंट ( Mughal Sarai Restaurant)

९) एन.आय.बी. एम. कॅपिटल मॉल सिल्वर स्पून (Silver spoon) हॉटेल

१०) एन.आय.बी.एम ज्योती हॉटेल टेरेसवर एक्झोटीका ( Exotica) रेस्टॉरंट
हॉटेल. व बँक्वेट टाऊन ( Banquet Town)

११) एन. आय. बी. एम. रॉयल हेरिटेज दोराबजी पॅराडाईज डी मार्ट टेरेसवर एजंट जॅक,स ( Agent Jac’s ),१२) मश रेस्टो ( Mush Resto),१३) तंदुर फॅटरी ( Tandoor Factory),१४) आय.आर.आय.एस बॅनक्युट ( IRIS Banquet) १५) शिशाह रेस्टॉरंट (Shisha Restaurant) एकाच इमारतीत चालू आहे.

१६ ) नाईन हिल्स प्लाझा सैनिक विहार रोड कॉफी हब ( Coffee Hub)

१७ ) एन आयबीएम क्लोवर हिल्स प्लाझा द ब्रेक रूम ( The Break Room) १८) लेव्हिटा ( Levitate) १९) एफएमएल (FML) एकाच इमारतीत चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here