पुणे सिटी टाईम्स (PCT)प्रतिनिधी, बेकायदेशीरपणे पिस्टल घेऊन मिरवणार्या गुन्हेगाराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक अनिकेत बाबर यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की,पुणे रेल्वे स्टेशन गेट नं.४, चे समोर असलेल्या एच.पी.पेट्रोल पंपालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयालगत संतोष शिंदे नावाचा इसम उभा असून त्यांचेकडे पिस्टल आहे.
मिळालेल्या बातमी नुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी व कर्मचारी आणि पंच असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून पाहणी केली. संशयास्पदरीत्या उभा असलेला संतोष शिंदे हा दिसला.
तो सतत इकडे तिकडे पाहत होता. त्यास पळण्याची संधी न देता ताब्यात घेऊन नांव पत्ता विचारता त्याने आपले नाव संतोष शंकर शिंदे ऊर्फ शेंडगे वय २२ वर्षे,रा. गल्ली नं. ४७, लुंकड शाळेजवळ, तळजाई वसाहत, पद्मावती, सहकारनगर,असे असल्याचे सांगीतले.
त्यास या ठिकाणी येण्याचे कारण विचारता तो योग्य कारण सांगण्यास असमर्थ ठरला व तो कावरा बावरा झालेचे दिसुन आले.त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँन्टमध्ये कंबरेस डाव्या बाजुस खोचलेले ६२ हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आली.
या बाबत पोलीस अंमलदार पोलीस नाईक अनिकेत बाबर यांनी तक्रार दिल्यानंतर संतोष शिंदे विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष शंकर शिंदे याचे विरुध्द पुर्वी दौंड पोलीस ठाणेस दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी सदरची कामगिरी रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त,यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी,