पुणे हडपसर भागात अवैध मटक्याचे धंदे जोमात; हडपसर पोलिसांकडून कारवाईकडे सर्रास दुर्लक्ष

0
Spread the love

हडपसर पोलिस ठाण्यातील वसुली बहाद्दरांकडून परमिशन दिल्याची ठाण्यातच चर्चा?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असल्याचे सांगितले जात असले तरी आज पुण्यासारख्या शहरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. त्याला कारण आहे “वसुली बहाद्दर”, वसुली वाल्यांकडून वरिष्ठांची मर्जी राखली जात असल्याने वसुली बहाद्दरांची गाडी सध्या सुसाट वेगाने धावत आहे.

तसेच अवैध मटका, जुगार, व्हिडिओ गेम, व इतर धंदे जोरात सुरू असतानाही वरिष्ठांची मर्जी राखल्याने आमचं कुणीच काही करू शकत नाही? असा आत्मविश्वास त्या वसूली बहाद्दरांचा झाला आहे.

हडपसर मध्ये दोन दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १० जणांवर गुन्हे दाखल केले होते. तरीही आज मटका जुगार जोराने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. हडपसर मधील महादेव नगर गल्ली नंबर २ येथील किनारा हॉटेल मागेच एका पत्र्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर मटका जुगार चालू असल्याचे आढळून आले आहे.

सदरील अवैध धंदा हा मोडक, कुलकर्णी चालवत असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे. तर त्याला धंदा चालविण्यासाठी दोन वसुली बहाद्दूर “चंगू मंगूने” परमिशन दिल्याची हडपसर पोलिस ठाण्यातून चर्चा ऐकायला मिळत आहे. हडपसर भागात आणखीन ठिकाणी चालू असलेल्या अवैध धंद्यांचा उलगडा लवकरच करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here