खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी , भवानी पेठेत शुल्क कारणावरून पत्नीला लाथा बुक्क्याने मारहाण करून त्याला ठार मारल्या प्रकरणी पतीला खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशी की सतत मूल भांडण करतात व त्रास देत आल्याची तक्रार करणाऱ्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने पत्नीचा लाथा-बुक्यांनी मारहाणकरून खून केल्याचा खळबळजनक घटना भवानी पेठेत उघडकीस आली आहे.
आसमा तौसिफ हवारी-शेख वय २७ असे खून झालेल्या विवाहितीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती तौफिक नूरहसन हवारी-शेख याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब भवानी पेठ येथील गुलशन बेकरीच्या मागे कुटुंब राहण्यास आहे. दरम्यान तौफिक हा सलूनच्या दुकानात काम करतो. त्याला दोन अपत्य आहेत.
दरम्यान मूल सतत भांडण करतात आणि त्रास देत असल्याबाबत
पत्नी सांगत असे. त्यावरून या दोघात भांडण देखील होत. रात्री देखील पत्नीने मूल त्रास देत असल्याबाबत सांगितले.
त्यावेळी तो जेवण करत होता. त्याने जेवण तरी करू देता का,असे म्हणाला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तर पोटात देखील लाथा घालून डोके भिंतीवर आपटले. यात गंभीर मार लागला. त्यानंतर आसमा या झोपल्या. सकाळी उशीर झाल्याने पती पत्नी आसमा यांना उठवण्यास गेला असता त्या उठल्या नाही.
त्यांचे आंग थंड पडले होते. त्यावेळी हा प्रकार समोर आला. माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.