भवानी पेठ काशेवाडी भागात भंगार विक्रेत्याकडून रेशनिंगचा धान्य विकला जात असल्याने गुन्हा दाखल

0
Spread the love

वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अन्नधान्य वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात का आली?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

नागरिकांचे तोंडाचे घास पळवून शासकीय रेशनिंगचे धान्य विक्री केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. असाच एक भंगार विक्रेता रेशनिंग दुकानदार व नागरिकांकडून रेशनिंगचे धान्य खरेदी करून ते मिलला पाठवत असल्याचे समोर आले आहे.

खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते विजय कांबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली, टेम्पो क्रमांक १६६२ मध्ये सरकारी रेशनिंगचा तांदूळ पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरून तो बेकायदेशीर विक्री करता नेला जात आहे.

pune ration news | भवानी पेठेतील काशेवाडीत रेशनिंग धान्य विकताना पुरवठा विभागाची कारवाई

पोलिसांनी सदरील टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता भावानी पेठेतील काशेवाडी येथील भंगार विक्रेता जावेद लालू शेख ह्याचा माल असल्याचे समजले, काशेवाडीत जाऊन तपासणी केली असता जावेद लालू शेख ह्याच्या भंगाराच्या दुकानात धान्य सापडून आले, २४.५ किंवटल धान्य असल्याचे समजले आहे.

जावेद शेख व टेम्पो चालक निजाम शेख यांच्या विरोधात जिवना आवश्यक्य वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांकडून नाव का लपविले जात होते? कारवाई बाबतीत कमालीची गुप्तता का बाळगली? रेशनिंगचे शासकीय पोत्यात किती धान्य सापडले? या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर अहवालात दडलंय काय? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिका-यांनी अहवाल देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

तर असे शासकीय धान्याची खरेदी विक्री होत असेल तर “पुणे सिटी टाईम्सशी” ९८८१४३३८८३ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here