पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जात असे परंतु आता खूनेचे माहेर घर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे. पुणे शहरात बघता बघता मुडदे पाडले जात आहे. तर पुणे सारख्या शहरात गुन्हेगारांनी दहशत माजवली आहे. गणेश पेठेतील बुरूड आळी येथे युवकाचा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी तरुणाचा पाठलाग करुन त्याला इमारतीच्या छतावर गाठले अन् कोयत्याने सपासप वार करुन त्याचा निर्घण खून केला. ही घटना गणेश पेठेतील बुरुड आळी गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सिद्धार्थ नंदकुमार हादगे वय २९, रा. बुरुड आळी, गणेश पेठ, असे खून झालेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी हर्षल पवार व त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे याचे हर्षल पवार व त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाले होते.सिद्धार्थ हा रात्री बुरुड आळी गल्लीत असताना हर्षल पवार व त्याचे साथीदार हे कोयते घेऊन आले.
त्यांना पाहून सिद्धार्थ लपण्यासाठी ओसवाल बिल्डिंगमध्ये शिरला. तो पळत पळत छतावर गेला. पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांसमोर एका प्रकारे आव्हानच आहे.