पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील एका रिक्षा चालकाने पॅसेंजरला मारहाण करून लूट केल्याची घटना घडली आहे. सदरील घटनेची फिर्याद सोफियान अहमद, वय-३९, रा. सैयदराजा, बरहनी, सैयादराजा, उत्तर प्रदेश यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्या फिर्यादीवरून रिक्षा चालक १).प्रदिप सिद्धेश्वर क्षीरसागर, वय – ४०, रा. खराडी, २). सुजीत बाबासाहेब लाटे,वय-२८, रा.खराडी, यांना अटक करण्यात आली आहे. काल दि. २६ रोजी सकाळी साडेपाच ते आठच्या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन चौकातुन कुरकुंभ येथे जाताना वाटेत फिर्यादी हे त्यांचे गावातील सहकारी यांचेसह पुणे स्टेशन येथुन कुरकुंभ येथे जाण्यासाठी रिक्षा चालक
याचेसोबत ४५० रुपये भाडे ठरवुन, रिक्षा मध्ये प्रवासी म्हणुन बसले असताना सदर इसमाने त्याची रिक्षा वाटेत एका ठिकाणी उभी करुन, फिर्यादी यांना शिवीगाळ व काठीने मारहाण करुन,त्यांचेकडील एकुण ६ हजार ६०० रुपये रोख जबरदस्तीने हिसकावुन घेवुन “अभी ज्यादा कुछ बोला तो छोड़ेंगे नहीं” असे म्हणुन धमकी दिली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.