पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील विभागीय उप संचालक कार्यालयतील वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ३४०/२०२३, भादविक ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद सहा. शिक्षण उप-निरीक्षक, पुणे विभागातील महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे.१४ सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२२ चे कालावधीत विभागीय शिक्षण उप संचालक कार्यालय, पुणे विभाग,येथे यातील फिर्यादी हे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग, येथे सहा. शिक्षण उप-निरीक्षक या पदावर आहेत.
सदर विभागातील सन २०१६, २०१७ व २०१८ या सालातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे शिबीरातील वैयक्तिक मान्यतांचे जावक अभिलेख एकुण – ५ नग ३००रूपयेचे हे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेले आहे.फिर्यादी यांनी आजरोजी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक चेतन धनवडे करीत आहेत.