घाईगडबडीत निकृष्ट दर्जाची होत आहे कामे?
घाईघाईत झालेल्या कामांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अनागोंदी कारभाराबद्दल जेवळे “कौतुक” करता येईल तेवढे कमीच आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला विकास कामांची लग्न घाई झाल्याने निकृष्ट दर्जाचे कामे होत असताना देखील वरिष्ठ डोळे बंद करून बसलेले आहेत.
ज्या फुटपाथवर नागरिकांच चालनचं नाही, असे फुटपाथ बनविण्याचे काम सध्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया तर्फे सुरू आहे. मागच्याच वर्षी बनवलेले फुटपाथ या वर्षी पुन्हा नव्याने बनविले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया मार्फत बनविलेले फुटपाथ एका महिन्याच्या आतच खड्डे पडल्याचे व तुटले दिसून येत आहे.

भवानी पेठेतील पुना कॉलेज रोडवरील भांडारशहा कब्रस्तान ते चुडामन तालीम चौका पर्यंत नव्याने फुटपाथ बनविण्यात आले, परंतु ते फुटपाथवरील सिमेंटचे ब्लॉक काही ठिकाणी निखळले आहे तर काही ठिकाणी आत ढासळल्याचे दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी बसवलेले ब्लॉक ढासळत असेल तर त्या कामांचा अंदाजा न घेलेलाच बरा?

सदरील ठिकाणी निकृष्ट दर्जाचे कामे झाले असतानाही सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी झाली आहे. कामे होत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी करणे अपेक्षित असताना ते दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार अबाडधबाड कामे करून मोकळे होत आहेत.

खरं तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अनेक कामांबाबतीत अनेक वेळा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. कामे ऑटोपण्याच्या तयारीत निकृष्ट कामे करून बिलासाठी ठेकेदार तयार होत आहे. आताच झालेली कामे निखळत असतील तर येत्या काही दिवसांतच पुन्हा कामे करावी लागतील यात काही शंकाच नाही.
अधिक माहितीसाठी उपअभियंता मचाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सदरील काम विकेंद्रितीतून करण्यात आली आहे. सदरील ठिकाणी पाहणी करून दुरूस्ती केली जाईल, परंतु किती वेळा दुरूस्ती करणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित ठेकेदाराविरूध कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. क्रमशः